औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 05:27 PM2018-11-29T17:27:39+5:302018-11-29T17:29:02+5:30
औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
औंढा नागनाथ (हिंगोली ) : औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शेतकऱ्यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तालुकात्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, तालुक्यात रोजगार हमीची कामे त्वरित चालू करावी, मागेल त्या शेतकऱ्यास सिंचन विहीर देण्यात यावी, विद्युत जनित्र त्वरित बदलून द्यावीत, कृषी अवजारे वेळेवर द्यावी, फळबाग योजना रोहयो अंतर्गत देण्यात यावी, पीक कर्ज तात्काळ मिळावे, थकीत चुकारे वा मदत जमा करावी, वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने करावा,शेती व पिण्यासाठी पाणी उपलबद्ध करावे, आदी मागण्यांसाठी आज दुपारी १२ च्या दरम्यान शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात तालुक्यातील शेतकऱ्यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चास सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अजय मुंदडा, तालुका अध्यक्ष अंकुश आहेर, प स सभापती भीमराव भगत , उप सभापती रामप्रसाद कदम, जी प सदस्य श्रीशैल्य स्वामी, माऊली झटे, जी डी मुळें यांनी संबोधित केले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मोहनराव बोथिकर यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे राजेंद्र सांगळे, राजाभाऊ मुसळे, अनिल देशमुख, साहेबराव देशमुख, बंडू चोंढेकर, बबन ईघारे, पांडुरंग नागरे आदींची उपस्थिती होती.