बँड लावून स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:06 PM2017-08-07T15:06:23+5:302017-08-07T15:13:31+5:30
स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी १ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील पाच दिवसांत शासनाने या मागण्यांवर कोणताच विचार केलेला नाही. यामुळे आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या दुकानदारांनी बँड लावून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
ऑन लाईन लोकमत
हिंगोली, दि. ७ : स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी १ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील पाच दिवसांत शासनाने या मागण्यांवर कोणताच विचार केलेला नाही. यामुळे आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या दुकानदारांनी बँड लावून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर अन्न महामंडळ सुरू करावे, स्वस्त धान्य दुकानदारांना दरमहा ३५ हजार मानधन द्यावे, ई-पॉसच्या अंमलबजावणीसाठी युनिट रजिस्टरप्रमाणे डाटा बेस दुरुस्ती करावी अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मागील पाच दिवसांत शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष्य केले आहे. कामबंद आंदोलनाने पाच दिवसापासून सर्व दुकाने बंद आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर त्यांनी मालही उचलला नाही.
पाच दिवस उलटूनही काम बंद आंदोलनाची ची दखल न घेतल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुकानदारांनी वेगळाच मार्ग अवलंबला. तहसील कार्यालयासमोर बँड लावून त्यांनी धरणे दिली व गांधीगिरी केली. यात भिकूलाल बाहेती, अशोक काळे, फारुखखाँ पठाण, सुभाष कंधारकर, संजय खंडेलवाल, नवनाथ कानबाळे, ओमप्रकाश ठमके आदींसह दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.