नाफेडची ३.२३ कोटींची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:38 AM2018-02-24T00:38:07+5:302018-02-24T00:38:23+5:30

जिल्ह्यात नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर झालेल्या प्रकारामुळे यापूर्वी शेतकºयांना चुकाºयांसाठी नाहक चकरा मारण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता बाजार समित्यांना दररोज याबाबतचा खरेदीचा अहवाल देण्यास बजावले असून २१ फेब्रुवारीपर्यंत ६७९ शेतकºयांची ५९४२ क्विंटल तूर खरेदी केली आहे. ती ३.२३ कोटी रुपयांची आहे.

 Shop for Rs 3.23 crores of Nafed | नाफेडची ३.२३ कोटींची तूर खरेदी

नाफेडची ३.२३ कोटींची तूर खरेदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर झालेल्या प्रकारामुळे यापूर्वी शेतकºयांना चुकाºयांसाठी नाहक चकरा मारण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता बाजार समित्यांना दररोज याबाबतचा खरेदीचा अहवाल देण्यास बजावले असून २१ फेब्रुवारीपर्यंत ६७९ शेतकºयांची ५९४२ क्विंटल तूर खरेदी केली आहे. ती ३.२३ कोटी रुपयांची आहे.
हिंगोली जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावरून अनेक वाद उभे राहिलेले आहेत. कुठे वेळेवर केंद्र सुरू झाले नाीहत तर कुठे खरेदी सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच केंद्र बंद पडण्याचे प्रकार घडले. गतवर्षी तर यातच पूर्ण वर्षे वाया गेले. तरीही तुरीची खरेदी अंतिम झाली नव्हती. पावसाळ्यातही या खरेदीचा मुद्दा गाजताना दिसत होता. हिंगोली व जवळ्यात तर पावसाळ्यात शेतकºयांचा माल भिजण्याचा प्रकारही घडला होता. यंदा खरेदी सुरू झाली आणि उडीद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी हिंगोलीत अनियमिततेचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे चुकारे मिळण्यात अडचणी उभ्या राहिल्या होत्या. शेतकºयांना उपोषणे करण्याची वेळ आली होती. इतर ठिकाणीही फारसे वेगळे चित्र नव्हते. शेतकºयांना चुकारे वेळेवर मिळत नसल्याचा अनुभव जिल्हाभर येत होता.
या सर्व प्रकारानंतर आता दैनंदिन अहवाल सादर करण्याचा आदेश नाफेडच्या केंद्रांना दिला आहे. यामुळे खरेदीच्या प्रक्रियेत काही गडबड होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी नियंत्रणही ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र रोज केवळ दहा ते तीस शेतकºयांचाच माल येत असल्याचे चित्र असून यापूर्वी होणारी गर्दी आता दिसत नाही. याउलट मोंढ्यातील बिटात त्यापेक्षा जास्त माल येत आहे. हमी केंद्रांची हमीच उरली नसल्याचे चित्र आहे.
अशी आहे खरेदी : बाजार समित्यांचे चित्र
२१ फेब्रुवारी रोजी हिंगोलीत ११ जणांची १२७ क्ंिवटल, सेनगावात २५ जणांची २३८, कळमनुरीत २१ जणांची १७३, वसमतला १८ जणांची १२0 तर जवळा बाजार येथे ३६ जणांची २९३ क्ंिवटल तूर खरेदी झाली आहे. आतापर्यंतचा विचार केला तर हिंगोलीत ३३ जणांची ३८६ क्विंटल, सेनगावात १८५ जणांची
१९६२ क्विंटल, कळमनुरीत १८२ जणांची १२६२ क्ंिवटल, वसमतला ११२ जणांची ६४८ क्ंिवटल, जवळा बाजारला १६७ जणांची १६८८ क्ंिवटल तूर खरेदी झाली आहे. सर्वाधिक सेनगावात तर सर्वांत कमी हिंगोलीत खरेदी झाल्याचे दिसून येत आहे.
हिंगोलीत २१.0६ लाख, सेनगावात १.0६ कोटी, कळमनुरीत ६८.४५ लाख, वसमतला ३५.३४ लाख, जवळा बाजारला ९२.0२ लाखांची खरेदी झाली असून काहींचीच चुकाºयांची प्रक्रिया झाली आहे.

Web Title:  Shop for Rs 3.23 crores of Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.