‘यंगिस्तान’चा लक्षणीय पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:18 AM2019-04-19T00:18:29+5:302019-04-19T00:18:43+5:30

लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर केला

 Significant Initiative Of 'Youth' | ‘यंगिस्तान’चा लक्षणीय पुढाकार

‘यंगिस्तान’चा लक्षणीय पुढाकार

Next

माझे पहिले मत मी विकासाला दिले आहे. आधी अनेक प्रश्न मनात उभे राहिले. परंतु मतदान करताना काही अडचण आली नाही. शिवाय मतदान कसे करतात, याची उत्सुकता होती. अखेर १८ एप्रिल २०१९ रोजी मी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. जागरूक नागरिकाचे कर्तव्य पार पाडत मी मतदान केले व याचे मला समाधान वाटत आहे.
- सुप्रिया दीपके, हिंगोली
प्रथमच मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद
मतदान करण्याची उत्सुकता असल्याने मी १८ एप्रिलची वाट बघत होते. सर्वत्र राजकीय चर्चा आणि निवडणुकीचे वातावरण असल्याने मतदान कसे करतात, यासह अनेक प्रश्न मनात उभे राहिले. परंतु मतदान करताना काही अडचण आली नाही. मी योग्य विचार करून मतदान केले आहे.
- तृप्ती फटाले हिंगोली.
देशाच्या विकासासाठी माझे पहिले मत दिले
देशाच्या विकासासाठी माझे पहिले मत दिले याचा मला अभिमान आहे. आज मतदानाचा दिवस असल्याने सकाळीच तयारी केली. वडिल आणि मी दोघेही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलो. यावेळी मात्र न विसरता ओळखपत्र मी सोबत घेऊन आलो होतो. मला आवडणाऱ्या नेत्याला मी मतदान केले.
- सौरभ शर्मा, हिंगोली
योग्य उमेदवारास मतदान केल्याचे समाधान
सोळाव्या वर्षीपासून मतदान करण्यासाठी उत्सुक होतो. आज मला पहिल मतदान देशाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी आणि लोकसभेसाठी करीत असल्याचा आनंद वाटत आहे. आणि मी योग्य उमेदवारास मतदान केले. त्याचा आनंद होत आहे.
- अमन झांजरी औंढा नागनाथ.

Web Title:  Significant Initiative Of 'Youth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.