सहा संचालकांचे राजीनामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:35 AM2018-08-20T00:35:39+5:302018-08-20T00:36:25+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ९ संचालकानी १६ आॅगस्ट ला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकांचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ. निळंकठ गडदे यांनी मंजूर केले. उर्वरित तिन संचालकांचे राजीनामे मंजूरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रंलबीत ठेवले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ९ संचालकानी १६ आॅगस्ट ला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकांचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ. निळंकठ गडदे यांनी मंजूर केले. उर्वरित तिन संचालकांचे राजीनामे मंजूरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रंलबीत ठेवले आहेत. सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सध्या अस्तिवात आलेले संचालक मंडळ तिन वषार्पूर्वी झालेल्या निवडणूकीच्या माध्यमातून सत्तेवर आले.
लोकशाही मार्गाने आलेल्या या सत्तेची सुत्रे बाजार समितीच्या विकासासाठी भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे व माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर गटाकडे मतदारांनी सोपवली; पंरतु या दोन गटाचा युती मधील सत्तेची तडजोड अन् विरोधी गटाने सत्ताधारी संचालकाविरोधात अपात्रेतेची दाखल केलेली प्रकरणे त्यावर झालेली कारवाई यामुळे तीन वर्षात बाजार समितीच्या राजकारणातील सघंर्ष टोकाला गेला आहे. शेतकरी हिताचे बाजार समिती ,विकासाचे निर्णय कमी झाले. त्याउलट सत्तेचा सारीपाटच तीन वर्ष
रंगत गेला. सत्तेच्या राजकारण सत्ताधारी संचालकानी त्याचा गटाच्याच सभापती डॉ. निळकंठ गडदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. सभापती गडदे यांनी विरोधी संचालकाची मदत घेवून हा ठराव बारगळवला. अशा परिस्थितीत सत्ताधारी संचालकानी सामूहिक राजीनामे दिले असून बाजार समिती चे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे राजकीय गणित माडले आहे. या राजकीय डावात आ. मुटकुळे यांनी स्व:तहा उडी घेतली. माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर हे मात्र दोन्ही बाजूंनी काँग्रेसचेच संचालक असल्याने घडामोडीत अलिप्त राहिले आहेत.
आगामी काळात सत्तेचे राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे पहावे लागणार आहे. असे असले तरी या राजकारणात बाजार समिती हिताचे कोणत्याच गटाला काही देणे घेणे नसून राजकारणासाठी आर्थिक नाडी मजबूत करणाऱ्या सेनगाव बाजार समितीच्या कारभाराचे शेतकरी हिताच्या धोरणांचे राजकारणाने मात्र कंबरडे मोडले आहे. राजीनामे देवून प्रशासकीय संचालक मंडळ आणण्याचा डाव भाजपचा गटाचे यशस्वी होतात का? सभापती गडदे हे सत्ता आणि पद कसे राखतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
९ संचालकांचे १६ आॅगस्ट रोजी राजीनामे
९ संचालकानी १६ आॅगस्टला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकाचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ.निळकंठ गडदे यांनी मंजूर केले. यामध्ये अमोल चंद्रकांत हराळ, शिक्षण सभापती संजय देशमुख, माजी सभापती शंकरराव बोरुडे, कांतराव कोटकर, गोदावरी शिंदे, द्वारकदास सारडा आदी सहा संचालकाचे राजीनामे मंजूर केले. संचालक गोपाळराव देशमुख, गिरीधारी तोष्णीवाल, सुमित्रा नरवाडे या तीन संचालकांचे राजीनामे प्रलंबित ठेवले आहेत. या तीन्ही संचालकांचे राजीनामे संबंधी कार्यलयीन प्रकीयेत बाकी असल्याने ते मंजूर झाले नाहीत, असे सभापती गडदे यांनी सांगितले. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाची संख्या दहावर येवून ठेपली आहे. एकुण १८ संचालकीय बाजार समितीमध्ये यापूर्वी एक रिक्त, एक मयत असे सोळा संचालक होते. सहा संचालकानी राजीनामे दिल्याने दहा संचालक कार्यरत राहिले.