कोरोनाचे सहा नवे रुग्ण; सहा बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:38+5:302021-06-25T04:21:38+5:30

२४ जूनला करण्यात आलेल्या अँटिजन चाचण्यांमध्ये सेनगावात १७२ पैकी १ बाधित आढळून आला. तर हिंगोलीत १३८, वसमत ६०, औंढ्यात ...

Six new patients with corona; Heal six | कोरोनाचे सहा नवे रुग्ण; सहा बरे

कोरोनाचे सहा नवे रुग्ण; सहा बरे

Next

२४ जूनला करण्यात आलेल्या अँटिजन चाचण्यांमध्ये सेनगावात १७२ पैकी १ बाधित आढळून आला. तर हिंगोलीत १३८, वसमत ६०, औंढ्यात १३१ व कळमनुरीत २५५ चाचण्या केल्यावर एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात ४० पैकी सुराणानगर १, एनटीसी १, आझम कॉलनी १ असे तीन बाधित आढळले. औंढा परिसरात १०६ पैकी माथा १ व रेवणसिद्ध तांडा १ असे दोन बाधित आढळले. वसमतला ७०, कळमनुरीत ४० तर सेनगावात २७ जणांची चाचणी केल्यावर एकही बाधित आढळला नाही. आज बरे झाल्याने जिल्हा रुग्णालयातून २, लिंबाळा येथून २ तर सेनगाव येथून २ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे १५ हजार ९२२ रुग्ण आढळून आले. यापैकी १५ हजार ५०५ जण बरे झाले तर ३८१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर आहेत तर ३ जणांची अतिगंभीर आहे. त्यामुळे त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे. सध्या नागरिक कोरोनाचा कहर कमी झाल्याचे समजून गांभीर्य पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मध्यंतरी एक ते दोन रुग्णांवर आलेला आकडा आता पुन्हा पाच ते सहांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून या आजारापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Six new patients with corona; Heal six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.