पोलिसांच्या मदतीने गरजूंच्या चेहऱ्यांवर फुलले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:39+5:302021-05-15T04:28:39+5:30
हिंगोली : जिल्हाभरात पोलीस प्रशासनाच्या वतीने १४ मे रोजी गरजू लोकांना मोफत अन्नधान्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले. पोलिसांच्या ...
हिंगोली : जिल्हाभरात पोलीस प्रशासनाच्या वतीने १४ मे रोजी गरजू लोकांना मोफत अन्नधान्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने गरजूंच्या चेहऱ्यांवर हास्य फुलल्याचे पाहावयास मिळाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार बंद असल्याने मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना थोडी मदत व्हावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देत गरजूंना अन्नधान्य, कपड्यांचे मोफत वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, १४ मे रोजी जिल्हाभरातील पोलीस ठाण्याच्या वतीने गरजूंना मदतीचे वाटप करण्यात आले. हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील कार्यक्रमास पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, पो.नि. पंडित कच्छवे, पो.उप.नि. पी.के. कांबळे, गंगाधर बनसोडे आदींची उपस्थिती होती. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील कार्यक्रमास सपोनि. बी.आर. बंदखडके, पो.उप.नि. भाग्यश्री कांबळे, पोना. अशोक धामणे, पोले, गजानन पोकळे, हरकळ, बुर्से, आशिष उंबरकर आदींची उपस्थिती होती. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने माळवटा, बाभूळगाव येथील पारधी वस्तीवर अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सपोनी विलास चवळी, भुजंग कोकरे, गोरे, पो.ना. अवचार, साहेबराव चव्हाण आदी उपस्थित होते. औंढा पोलीस ठाण्याच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पो.नि. वैजनाथ मुंडे, एपीआय ए.जी. लांडगे, जमादार गणेश नरोटे, निवृत्ती बडे, राजकुमार सुर्वे आदींची उपस्थिती होती. सेनगाव पोलीस ठाण्यातील कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पो.नि.कृष्णदेव पाटील, स.पो.नि. दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभय माकने आदींची उपस्थिती होती, तसेच आखाडा बाळापूर, हट्टा, नर्सी नामदेव, कळमनुरी, वसमत शहर, गोरेगाव, कुरुंदा, बासंबा पोलीस ठाण्याच्या वतीनेही गरजूंना अन्नधान्य, कपड्यांचे वाटप करण्यात आले.
फोटो :