शहरात भोळसर व्यक्तींची शुश्रूषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:10 AM2017-12-25T01:10:56+5:302017-12-25T01:11:12+5:30
शहरात दोन आठवड्यापासून स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गल्लीबोळात फिरत असलेल्या भोळसर व्यक्तींना आधार दिला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरात दोन आठवड्यापासून स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गल्लीबोळात फिरत असलेल्या भोळसर व्यक्तींना आधार दिला जात आहे.
रविवारी पुन्हा एका भोळसर व्यक्तीची कटिंग, दाढी करून आंघोळ घातली. या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
या फाऊंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे खरोखरच रस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत फिरणा-या भोळसर व्यक्तींना धीर मिळत आहे.
आठवडाभर या उपक्रमातील सदस्य शहरातील भोळसर व्यक्तीची ठिकाणे शोधून काढताना दिसत आहेत. रविवारी सर्व एकत्र येत त्या व्यक्तीची सुश्रूषा केली जात आहे.
या उपक्रमात अनेक अधिकारी, कर्मचा-यांसह, प्रतिष्ठित नागरिकही सभागी झाले आहेत.
तर अनेक सामाजिक कार्यकर्तेही या कार्यासाठी पुढे येत आहेत.
त्यामुळे अशा व्यक्तीची सेवा करण्यात आनंद मिळत असल्याने फाऊंडेशनचे सदस्य सांगत आहेत.