सोयाबीन खरेदी केंद्राचा तिढाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:27 PM2017-12-07T23:27:52+5:302017-12-07T23:27:56+5:30

मोठ्या विश्वासाने शेतीमालाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केली होती. मात्र आता संघाचे खरेदीचे अधिकार काढलेत. तर नाफेडच्या अधिकाºयाचा अपघात झाल्याने बाजार समितीला खरेदी सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.

Soyabean Shopping Center | सोयाबीन खरेदी केंद्राचा तिढाच

सोयाबीन खरेदी केंद्राचा तिढाच

googlenewsNext
ठळक मुद्देखविसंचे अधिकार काढले : बाजार समितीचे केंद्र बंदच

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मोठ्या विश्वासाने शेतीमालाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी केली होती. मात्र आता संघाचे खरेदीचे अधिकार काढलेत. तर नाफेडच्या अधिकाºयाचा अपघात झाल्याने बाजार समितीला खरेदी सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.
मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत आहेत. त्यातच शेतीमालाला भाव नसल्याने खुल्या बाजारात मातीमोल किंमत मिळत आहे. शासकीय खरेदी केंद्रावर जाचक अटी अन् प्रतीक्षा करण्यात व्यवहार ठप्प झाले आहेत. सलग दोन वर्षांपासून शेतकºयांच्या नशिबी हा दुर्देवाचा फेरा कायम आहे. आधी नाफेडने नडवले नंतर खरेदी विक्री संघातील संचालकांचा बेबनाव व गोंधळ अडचणीत आणणारा ठरला. या नादात पंधरा दिवसांपासून खरेदी-विक्री संघाचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडल्याने हिंगोली तालुक्यातील शेतकºयांना नाईलाजाने खाजगी बाजारात सोयाबीन विकावे लागत आहे. आता हे हमीभाव खरेदी केंद्र चालवण्याचे अधिकार बाजार समितीला दिले आहेत. मात्र हे केंद्र कधी सुरू होईल, याचाही काही नेम नाही. नाफेडच्या ज्या अधिकाºयाच्या हाती हे सगळे आहे, त्याचाच अपघात झाला. अशावेळी इतरांकडे शासनाने पदभार देणे अपेक्षित होते. मात्र तसेही होत नसल्याने शेतकºयांच्या नशिबी मात्र आणखी किती प्रतीक्षा राहील, हे कळयला मार्ग नाही. दोन वर्षांपासून हे दुष्टचक्र कायम आहे.

Web Title: Soyabean Shopping Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.