सोयाबीनला ३०२५ रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:53 PM2017-12-11T23:53:30+5:302017-12-11T23:53:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आखाडा बाळापूर : बाजार समिती अन् व्यापारी यांच्यातील तणाव कांही काळासाठी निवळला असून, तिस-या दिवशी शेतीमालाचा ...

Soybean cost Rs 3025 | सोयाबीनला ३०२५ रुपये भाव

सोयाबीनला ३०२५ रुपये भाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : बाजार समिती अन् व्यापारी यांच्यातील तणाव कांही काळासाठी निवळला असून, तिस-या दिवशी शेतीमालाचा लिलाव झाला. लिलावापूर्वी व्यापारी आणि बाजार समितीच्या चर्चेत व्यापा-यांनी आठ दिवसांत खेडाखरेदी बंद करण्याबाबत अल्टिमेटम दिला आहे. ही मागणी बाजार समिती प्रशासनाने मान्य केल्यानंतर चार दिवसांपासूनचा तणाव निवळला अन् लिलाव सुरू झाला. लिलावात सोयाबीनला २८५० ते ३०२५ रूपयांपर्यंतचा भाव मिळाला.
आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांनी शेतीमाल टाकला. पण लिलाव प्रक्रियेला विरोध करत व्यापा-यांनी लिलावासाठी जाणे टाळले. मंत्री महोदयांनाही गळ घालण्याचा प्रयत्न व्यापा-यांनी केला. पण मंत्र्यांनी खडे बोल सुनावल्यानंतर व्यापा-यांनी लिलावास तयारी दर्शविली. बाजार समितीनेही कडक धोरण स्वीकारले. अखेर रविवारी व्यापारी व बाजार समितीनेही सामंजस्याची भूमिका घेत लिलावात सहभागी होण्याचे मान्य केले. सोमवारी सकाळी ११ वाजता व्यापारी, बाजार समितीचे अधिकारी माजी आ. गजानन घुगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.आर.देशमुख, सेनेचे जिल्हा उपप्रमुख डी.के. दुर्गे यांची चर्चा झाली.

Web Title: Soybean cost Rs 3025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.