सोयाबीन गेले ९ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:31+5:302021-07-26T04:27:31+5:30
हिंगोली येथील भुसार मोंढ्यात शनिवारी जवळपास दोनशे ते तीनशे पोती सोयाबीनची आवक झाली होती. यातील काही शेतकऱ्यांना तब्बल ९ ...
हिंगोली येथील भुसार मोंढ्यात शनिवारी जवळपास दोनशे ते तीनशे पोती सोयाबीनची आवक झाली होती. यातील काही शेतकऱ्यांना तब्बल ९ हजार रुपयांचा दर मिळाला. साडेआठ हजारांच्या पुढेच शेतकऱ्यांना भाव मिळाला. मागच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन घटले होते. शिवाय सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा जास्त दर होता. काही दिवसांपूर्वी सात हजारांवर सोयाबीन गेल्यानंतर त्यापेक्षा जास्त दर वाढणार नाहीत, या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. मात्र आता सोयाबीनचे दर चक्क ९ हजारांवर गेले आहेत.
याबाबत व्यापारी प्रशांत सोनी म्हणाले, सध्या खाद्यतेलाचे दरही वाढलेले आहेत. शिवाय सोयाबीनची आवक या दिवसांत खूप कमी असते. खाद्यतेल कारखान्यांकडून सोयाबीनच्या प्रतवारीनुसार ९ हजारांच्या पुढे दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ९ हजारांपर्यंतचा दर मिळाला आहे. बाजारपेठेतील चढउतारानुसार हे दर मिळतात.