सभापतींचा २१ जुलै रोजी होणार फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:17 AM2018-07-16T00:17:45+5:302018-07-16T00:17:59+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या वर त्यांंचाच पक्षाच्या संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय २१ जुलै ला आयोजित विशेष बैठकीत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या वर त्यांंचाच पक्षाच्या संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय २१ जुलै ला आयोजित विशेष बैठकीत होणार आहे.
सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या विरोधात सत्ताधारी गटाच्याच काँग्रेस, भाजप, सेना आदी पक्षाच्या अकरा संचालकांनी ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला होता. सभापती गडदे हे संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत. सभा वेळेवर न घेणे, शेतमालाची नियमित बीट न करणे आदी कारणांवरून हा अविश्वास ठराव आणला गेला आहे.
यासंबंधी निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी २१ जुलै रोजी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. तब्बल अकरा सत्ताधारी संचालकांनीच अविश्वास ठराव दाखल केल्याने हा ठराव संमत होण्याची चिन्हे आहेत.
माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या समर्थक संचालकामधील अविश्वासाचा नाट्याने बाजार समितीचे राजकारण तापले आहे.
या अविश्वासाचा राजकारणात ऐनवेळी कोणते राजकीय समीकरण तयार होणार की, अविश्वास ठराव पारीत होणार याचा फैसला मात्र २१ जुलै रोजीच स्पष्ट होईल.