अनधिकृत बॅनरविरोधात सेनगावात विशेष अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:43 AM2018-08-26T00:43:16+5:302018-08-26T00:43:34+5:30
नगरपचांयतचा वतीने अनाधिकृत बॅनरविरोधात शुक्रवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. असे बॅनर काढून यापुढे अनाधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : नगरपचांयतचा वतीने अनाधिकृत बॅनरविरोधात शुक्रवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. असे बॅनर काढून यापुढे अनाधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शहरात उच्च न्यायालयाचा सूचनेनुसार अनधिकृत बॅनर हटविण्यास २० ते २४ आॅगस्टदरम्यान नगर प्रशासन अधिकारी चंद्रकांत सोनवणे, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवून शहरातील सार्वजनिक ठिकाणी, विद्युत खांबावर लावण्यात आलेले सर्व बॅनर, होर्डिंग हटविण्यात आले. यापुढे शहरात अनधिकृतपणे बॅनर, पोस्टर लावणाºयांविरोधात थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी खाजगी जागेतही बॅनर, पोस्टर लावताना परवानगी घ्यावी, असे आवाहन सीओ फडसे यांनी केले.