हिंगोलीत घरकुलांच्या कामांना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:36 AM2018-11-27T00:36:19+5:302018-11-27T00:36:37+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या ३५0 पैकी ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे इतर लाभार्थीही आता या कामाकडे वळत असून सगळीकडेच ही कामे सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या ३५0 पैकी ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे इतर लाभार्थीही आता या कामाकडे वळत असून सगळीकडेच ही कामे सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
हिंगोली शहरात प्रधानमंत्री आवास योजनेत पहिल्या टप्प्यात ३५0 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. अडीच लाख रुपये अनुदान यासाठी मिळणार आहे. यापैकी ३३७ जणांना घरकुल बांधकामासाठी कार्यारंभ आदेशही दिले आहेत. तर ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामही सुरू केले. तर २२ जणांनी दुसरा हप्ताही उचलला. अनेकांच्या घराचे काम आता छत लेवलला आलेले आहे. इतरांच्या घरकुलांची कामे होत असल्याने आता लाभार्थी आपल्या घरकुलाचे कामही सुरू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसू लागले आहेत.
घरकुल योजनेत लाभार्थ्यांनी कामाला गती दिल्यास त्यांना पुढील हप्ता तत्काळ देण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी कामे गतीने पूर्ण करीत असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले. उर्वरित लाभार्थींनीही कामे सुरू करून ती गतीने पूर्ण करून घेतल्यास तांत्रिक मदत नगरपालिका करेल, असेही पाटील म्हणाले.