एसआरपीएफ जवानाचा टोकाचा निर्णय; निवासस्थानात संपवले जीवन
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: January 22, 2025 19:06 IST2025-01-22T19:05:26+5:302025-01-22T19:06:39+5:30
या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली.

एसआरपीएफ जवानाचा टोकाचा निर्णय; निवासस्थानात संपवले जीवन
हिंगोली : येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ मधील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ जानेवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली.
गौतम मिलिंद शहाणे ( वय ३५) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. त्यांनी राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ मधील निवासस्थानाच्या छताच्या पंख्याला साडीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार अशोक धामणे, गणाजी पोटे, संतोष करे, धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
या प्रकरणी पोलिस अंमलदार सिद्धार्थ मिलिंद शहाणे (रा. लक्ष्मीनगर जुना पेडगाव रोड परभणी) यांच्या खबरीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. पोलिस अंमलदार पोटे तपास करीत आहेत.