एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:12+5:302021-09-23T04:33:12+5:30
हिंगोली : कोरोना महामारीच्या काळात एस. टी. महामंडळाने परराज्यातील बसेस बंद केल्या होत्या. परंतु, कोरोना महामारी कमी होताच महामंडळाने ...
हिंगोली : कोरोना महामारीच्या काळात एस. टी. महामंडळाने परराज्यातील बसेस बंद केल्या होत्या. परंतु, कोरोना महामारी कमी होताच महामंडळाने परराज्यात बसेस पाठविण्यास सुरुवात केली आहे. आजमितीस बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
२०१९ पासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला होता. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार एस. टी. महामंडळाने लांब पल्ल्यांच्या बसेससह पर राज्यातील बसेसही बंद केल्या होत्या. जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. हिंगोली ते हैदराबाद आणि वसमत-परभणी-हैदराबाद अशा दोन बसेस सध्या परराज्यासाठी सुरू आहेत, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.
हैदराबादला गाड्या फुुल्ल: प्रवाशांकडून प्रतिसाद...
हिंगोली ते हैदराबाद सकाळी सहा वाजता सुटते तर, वसमत-परभणी-हैदराबाद ही बस सकाळी १० वाजता सुटते. या दोन्ही बसेसला सध्या तरी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परराज्यात दोन बसेस सुरू केल्यामुळे दिवसाकाठी एस. टी. महामंडळाला २५ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.
परराज्यात जाणाऱ्या बसेस...
१) हिंगोली ते हैदराबाद
२) वसमत-परभणी-हैदराबाद
७५ टक्के लसीकरण पूर्ण..
कोरोना महामारी लक्षात घेता एस. टी. महामंडळाने चालक, वाहकांचे ७५ टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केली जात आहे, असेही महामंडळाने सांगितले.
प्रतिक्रिया
लांब पल्ल्यांच्या तसेच परराज्यातील बसेस सध्या सुरू आहेत. प्रवाशांकडून बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली ते हैदराबाद आणि वसमत-परभणी-हैदराबाद अशा दोन बसेस सध्या सुरू आहेत.
-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली