हिंगोली जिल्ह्यात विषय शिक्षक दर्जोन्नती समुपदेशनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:04 PM2018-11-19T16:04:01+5:302018-11-19T16:05:22+5:30
सोमवार व मंगळवार अशी दोन दिवस ही प्रक्रिया चालणार आहे.
हिंगोली : जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना समुपदेशानाने पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरूवात करण्यात आली आहे. सोमवार व मंगळवार अशी दोन दिवस ही प्रक्रिया चालणार आहे.
विषय शिक्षकांनी होकार दिलेल्या शिक्षकांनी जि.प. सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या आहेत. ६ वी ते ८ वीच्या वर्गावरील होकार दिलेल्या पात्र शिक्षकांना समुपदेशन प्रक्रियेद्वारे विषय शिक्षकासाठी पदोन्नती दिली जाणार आहे. याबाबत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी १७ नोव्हेंबर रोजी पत्र काढले होते. तसेच शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. पात्र शिक्षकांना कार्यरत शाळेवरच जागा रिक्त असेल तर तेथेच पदस्थापना देण्यात येणार आहे. कार्यरत शाळेवर विषय शिक्षकाची जागा रिक्त नसेल केंद्रांतर्गत शाळेत पदस्थापना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या ६७२ जागा रिक्त आहेत. होकार दिलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात येणार आहे.