सुट्टीच्या दिवशीही वीज बिल केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:25 AM2018-02-11T00:25:02+5:302018-02-11T00:25:06+5:30
सलग सुट्ट्यांमध्येही ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी गैरसोय होवू नये, म्हणून महावितरणने जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेली अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सलग सुट्ट्यांमध्येही ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी गैरसोय होवू नये, म्हणून महावितरणने जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेली अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
थकबाकी व चालू देयक न भरणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या सुरू असल्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होवू नये, याकरिता दुसरा शनिवार १० फेबु्रवारी आणि रविवार ११ तसेच मंगळवारी १३ रोजीही सुट्टी आहे. त्यामुळे वीजबील विहित मुदतीत भरण्यासाठी ग्राहकांना गैरसोयीचे होवू शकते. ही बाब लक्षात घेवून महावितरणने सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पतसंस्था आणि महावितरणच्या सर्व बिल भरणा केंद्राचा समावेश आहे. वीज कर्मचारीही या दिवशी सुट्टी घेणार नाहीत. वीज ग्राहकांनी बिल भरणा करून महावितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.