पुन्हा स्वाध्याय उपक्रमास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:53+5:302021-05-16T04:28:53+5:30
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत. तसेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी ...
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत. तसेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे. अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. मात्र, नव्याने सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत शाळेचा यु-डायस नंबर द्यावा लागणार आहे. यात १ ली ते ९ वीतील मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्वाध्यायमध्ये १ ली ते ५ वीतील प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न आणि ६ वी ते ९ वी तील प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असणार आहेत.
प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेच्या ठिकाणी जाऊन कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांकडून स्वाध्याय सोडून घेण्याचा प्रयत्न करावा. शाळास्तरावर आठवड्याभराचे नियोजन करून गावातील हुशार विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.