शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:38 AM2018-04-25T00:38:25+5:302018-04-25T00:38:25+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून दिली असून २६ एप्रिलपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत.

 Start of teacher transfers | शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून दिली असून २६ एप्रिलपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत.
यापूर्वी संवर्ग-१, २ व ३ मधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली आहे. तर संवर्ग ४ साठी आता प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व संवर्गातील मिळून २४१५ शिक्षकांची दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा असल्याने ते बदलीपात्र आहेत. यामध्ये प्राथमिक १९८२, प्राथमिक पदवीधर २५१ तर मुख्याध्यापक १८२ आहेत. आता संवर्ग १,२ व ३ वगळून इतर शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांमार्फत शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी राज्यासाठी एकच वेळापत्रक राहत असल्याने मोठी अडचण होत होती. मात्र आता टप्प्या-टप्प्याने अर्ज भरले जात आहेत. या टप्प्यात हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांना आता शासनाच्या महाट्रान्सफर या पोर्टलवर अर्ज भरावे लागणार आहेत. वेळेत अर्ज भरावे लागणार आहेत.

Web Title:  Start of teacher transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.