सोमवारपासून हरभरा खरेदीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:51 AM2018-04-22T00:51:10+5:302018-04-22T00:51:10+5:30
जिल्ह्यातील इतर केंद्रावर हरभरा खरेदी होऊन दोन आठवडे लोटले आहेत. हिंगोली येथील खरेदी केंद्रावर आदेश देऊनही जागेचे कारण दाखवत खरेदी लांबणीवर टाकली जात होती. याचे वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित होताच, सोमवार पासून खरेदी करण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील इतर केंद्रावर हरभरा खरेदी होऊन दोन आठवडे लोटले आहेत. हिंगोली येथील खरेदी केंद्रावर आदेश देऊनही जागेचे कारण दाखवत खरेदी लांबणीवर टाकली जात होती. याचे वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित होताच, सोमवार पासून खरेदी करण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगितले.
हिंंगोली येथील खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी जवळपास ८०० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती. तूर खरेदी बंद होताच हरभरा खरेदी सुरु होणार होती. मात्र दिवसेंदिवस हळदीची आवक वाढत असल्याने, नाफेडच्या केंद्रावर हरभरा टाकणे शक्य होत नव्हते. त्यामुळे वरिष्टस्तरावरुन हरभरा खरेदीचे आदेश देऊनही खरेदी बंद ठेवण्यात आली होती. मात्र सध्या तीन नंबरच्या मोंढ्यात हरभरा खरेदी करण्याचे नियोजन मार्केट कमेटीने केले आहे. खरेदी केंद्रावर नोंदणी झालेल्या शेतकºयांना हरभरा खरेदीस आणण्याचे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. सोमवारी हरभरा घेऊन येणाºया शेतकºयांची खरेदी केली जाणार आहे. हरभºयाला ४ हजार ४०० रुपये हमी भाव देण्यात आला. तर तुरीची खरेदी केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर चुकारे टाकणे सुरु असल्याचेही सचिव पाटील यांनी सांगितले.
हळदीला ८,५०० भाव
४या वर्षी पहिल्यांदाच हळदीला ८ हजार ५०० रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकºयातून समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. बीट होण्याच्या आदल्या दिवशी यार्डाबाहेर हळद घेऊन येणाºया वाहनांच्या रांगा लागत आहेत.