‘एसटीत’ वायफाय सुविधा नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:18 AM2018-08-13T01:18:06+5:302018-08-13T01:18:29+5:30
महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचा प्रवास आनंददायी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यसाठी राज्य परिवहनने बसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘वायफाय’ सेवा सुरू केली. मात्र सध्या बसमध्ये बसविण्यात आलेले वायफायचे हे डबे बंद की सुरू, हेच कळायला मार्ग नाही. प्रवासीही संभ्रमात असून संबधित आगारप्रमुखांनाही सुविधेबाबत माहिती नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचा प्रवास आनंददायी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यसाठी राज्य परिवहनने बसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘वायफाय’ सेवा सुरू केली. मात्र सध्या बसमध्ये बसविण्यात आलेले वायफायचे हे डबे बंद की सुरू, हेच कळायला मार्ग नाही. प्रवासीही संभ्रमात असून संबधित आगारप्रमुखांनाही सुविधेबाबत माहिती नाही.
राज्य परिवहनन महामंडळाच्या परभणी विभागीय कार्यालयाअंतर्गत हिंगोली, कळमनुरी, वसमत तसेच जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी एकूण सात डेपोचा सामावेश आहे. विभागात एकूण ४४७ बसेस आहेत. बस प्रवास प्रवाशांना कंटाळवाना वाटू नये, यासाठी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध केली. परंतु अनेक बसमधील वायफायची सिस्टिमच काम करत नाही. शिवाय कनेक्टीव्हीटीच नसल्यामुळे सुविधेचा वापर करता येत नसल्याची प्रवाशांतून ओरड आहे. या सुविधेचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले आहे. संबधित एजन्सी चालकाने बसमधील वायफाय सिस्टीम सुरू आहे, किंवा त्यात बिघाड झाला आहे का, याबाबत शहानिशा करणे गरजेचे आहे. परंतु असे होताना मात्र कुठे दिसत नाही. प्रवाशांनी वायफाय कसे कनेक्ट करावे, याचे बॅनर मात्र प्रत्येक बसध्ये डकविण्यात आलेले आहेत.
हिंगोली डेपोतील जवळपास ४० बसेसमध्ये वायफायची सिस्टिम बसविल्याचे सांगितले जात आहे. बसमधील वायफाय सुविधेची सिस्टिम सुरू असल्याचे आगारप्रमुख बी. बी. झरीकर यांनी सांगितले. परंतु एकत्रित माहिती किंवा दुरूस्तीबाबत संबंधित एजन्सी चालकाकडेच माहिती भेटू शकले असे ते म्हणाले. त्यामुळे महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाने मोठ्या गाज्यावाज्यात सुरू केलेल्या या सुविधेचा प्रवाशांना उपयुक्त ठरत आहे का, हे सांगणे कठीण आहे.
वायफाय सुविधेबाबत परभणी येथील विभाग नियंत्रक जालिंदर सिरसाट दूरध्वनीवरून संपर्क केला असता, ते म्हणाले बसमध्ये वायफाय सिस्टिम बसविलेल्या आहेत. परंतु यातील कोण-कोणत्या बसमध्ये ही सुविध सुरू आहे, याची माहिती संबधित एजन्सीधारकांनाच माहीत असते.
असे त्यांनी सांगितले. संबधित एजन्सी चालकास संपर्क केला असता, याची एकत्रित आकडेवारी काढण्यात आली नाही. पाच ते सहा जिल्ह्यांतील कामकाज पहावे लागते. त्यामुळे सध्या विभागातील किती बसमधील वायफाय सुविधा सुरू आहे, हे सांगणे कठीण आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्या बसमध्ये वायफाय सुविधेचे बॉक्स बसविलेले आहेत. त्याच ठिकाणी या सुविधेचा वापर करण्याची जागो-जागी माहिती फलक आहेत.