कल्याणमंडपम येथे राज्यस्तरीय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:23 AM2018-12-24T00:23:27+5:302018-12-24T00:23:42+5:30
महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, गणेश बांगर, मुख्याधिकारी रामदास पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष के. के. आधळे, डी. पी. शिंदे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. या सोहळ्यासाठी राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतमधील २ हजार कर्मचारी उपस्थित होते.
संघटनेने दिलेल्या नोटीसा प्रमाणे ३१ डिसेंबर २०१८ पासून नगर पालिका नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या ७ वा वेतन आयोग, कर्मचाºयांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान व रोजंदारी कर्मचाºयांना कायम करणे, नगरपंचायतमधील कर्मचाºयांना ग्रामपंचायतमध्ये रुजू झालेल्या दिनांकापासून कायम करणे,नवीन आकृतीबंध तयार करून सफाई कामगारांचे व इतर पदे निर्माण करणे तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.