हिंगोलीजिल्ह्यातील ४ उपकेंद्रांवरून राज्यसेवा पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:20 AM2018-04-04T00:20:55+5:302018-04-04T00:20:55+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी ८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी ३ ते ५ या वेळेत हिंगोली जिल्हा मुख्यालयी ४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या उपकेंद्रावरून एकूण ११५२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी ८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी ३ ते ५ या वेळेत हिंगोली जिल्हा मुख्यालयी ४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या उपकेंद्रावरून एकूण ११५२ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरा अशी कोणत्याही प्रकारची साधने, सीमकार्ड, दूरसंचार साधने, बॅग्ज अथवा आयोगाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह केंद्राच्या परिसरात व परीक्षा कक्षात आणण्यास जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. केंद्रावर केवळ पेन, पेन्सिल , प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा मूळ पुरावा व त्याची छायाप्रत अथवा प्रवेश केंद्रावर प्रवेश देण्यात येईल . परीक्षा केंद्रावर बंदोबस्त असून प्रवेशद्वारावर पोलीसांतर्फे तपासणी केली जाईल. परीक्षे दरम्यान कॉपी, गैरप्रकार करताना कोणी आढळून आल्यास त्या उमेदवाराविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल होईल.