सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:57+5:302021-09-21T04:32:57+5:30
माहे सप्टेंबर २०२१ चे परिपूर्ण अन्नधान्य शासकीय अन्न धान्य गोदामात उपलब्ध नसून वेळेवर अन्नधान्याची आवक होत नाही. त्यामुळे ...
माहे सप्टेंबर २०२१ चे परिपूर्ण अन्नधान्य शासकीय अन्न धान्य गोदामात उपलब्ध नसून वेळेवर अन्नधान्याची आवक होत नाही. त्यामुळे १६५ स्वस्त धान्य दुकानास अन्नधान्य वितरण सुरु झालेले नाही. महिना संपण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कमी वेळेत तालुक्यांना अन्नधान्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली दुरुस्त करुन शासकीय अन्नधान्य गोदामात धान्य उपलब्ध करुन देणे व द्वारपोच योजनेंतर्गत स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्य उपलब्ध करुन दिल्यास माहे सप्टेंबर महिन्यात पात्र लाभार्थींना धान्य वितरण करणे शक्य होईल, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष भिकूलाल बाहेती, तालुकाध्यक्ष अशोक काळे,एल. जी. घुगे, आशिफ गौरी, मिलिंद कवाने, नवनाथ मुंढे, उत्तम इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो कॅप्शन
जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांना मागणीचे निवेदन देताना भिकूलाल बाहेती, अशोक काळे, एल. जी. घुगे, आशिफ गौरी आदी.फोटो २८