पोलीसपाटील संघटनेचे गृह राज्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:10+5:302021-07-20T04:21:10+5:30
गृहराज्यमंत्री देसाई १८ जुलैरोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पोलीसपाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन ...
गृहराज्यमंत्री देसाई १८ जुलैरोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पोलीसपाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. यामध्ये पोलीसपाटलांचे मानधन १५ हजार रुपये करणे, महाराष्ट्र राज्य पोलीसपाटील अधिनियम १९६७ सुधारणा करून त्याची अंमलबजावणी, पोलीसपाटलांचे नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे, निवृत्ती वयोमर्यादा अंगणवाडीसेविका व आशा वर्कर यांच्याप्रमाणे ६५ वर्षे करावी, पोलीस ठाणे व पोलीस चौकी असलेल्या गावांमध्ये पोलीसपाटलांना कायम ठेवण्यात यावे, निवृत्ती वेतन देण्यात यावे, पोलीसपाटलांच्या पाल्यांना पोलीसपाटील भरतीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे, गावामध्ये शासकीय समित्यांवर पोलीसपाटील सदस्य म्हणून समावेश करण्यात यावा, कोरोना काळातील तीन महिन्यांचे अतिरिक्त मानधन देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हा सचिव डिगांबर शिंदे, जिल्हा सहसचिव मोहन नरवाडे, मुकिंदराव होडबे, गणेश आडे, गजानन मोरे, शिवाजी गिते आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो