रस्ते व पूल दुरुस्तीसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:46+5:302021-01-10T04:22:46+5:30
हिंगोली-जवळा-पळशी या मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास या रस्त्यावरून जवळपास तीस ते पस्तीस गावांची रहदारी सुरळीत होणार आहे. त्यामुळे या रस्त्यासह ...
हिंगोली-जवळा-पळशी या मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास या रस्त्यावरून जवळपास तीस ते पस्तीस गावांची रहदारी सुरळीत होणार आहे. त्यामुळे या रस्त्यासह त्यावरील सर्व पूल व दुपदरीकरणाची मागणी केली आहे. हिंगोली-सेनगाव - रिसोड या रस्त्याचे काम ज्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन केले, तसा दर्जा देऊन हे कामही पूर्ण करण्याची मागणी मुटकुळे यांनी केली आहे. त्याचबरोबर नर्सी रस्त्यावरील कयाधूवरील पूल, नर्सी नामदेव गितर्क व जलेश्वर तलाव हिंगोली आणि चिराग शहा तलावाचे सुशोभीकरण तसेच गवळीपुरा भागातील रस्ता,तलाब कट्टा रस्ता या बाबींनाही मंजुरी दिली तर हिंगोली शहरातील या परिसराला पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व येणार आहे. याबाबत तान्हाजी मुटकुळे म्हणाले, गडकरी यांनी यासाठी सकारात्मकता दाखविली असून त्यास मंजुरी मिळाल्यास ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.