पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:58+5:302021-05-30T04:23:58+5:30
सेनगाव येथे पाटील रुजू झाल्यापासून त्यांचा अवैध धंद्यांवर कोणताच वचक नाही. त्याला बंदी घालायची सोडून सर्वसामान्य व्यापाऱ्यांनाच कायद्याचा धाक ...
सेनगाव येथे पाटील रुजू झाल्यापासून त्यांचा अवैध धंद्यांवर कोणताच वचक नाही. त्याला बंदी घालायची सोडून सर्वसामान्य व्यापाऱ्यांनाच कायद्याचा धाक दाखवून गुन्हे दाखल केले जात आहेत. शिवाय यात अनेकांची पिळवणूकही होत आहे. अवैध धंद्यांविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी अवैध धंदेचालकांना पाठीशी घातले जात आहे. तसेच असा आवाज उठविल्याने कायद्याचा बडगा दाखवून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे या भागातील जनता पोलीस ठाण्याच्या अशा विचित्र कारभाराने त्रासून गेली आहे. त्यामुळे पाटील यांची इतरत्र बदली करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बदली न झाल्यास वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यासाठी माजी जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, राकाँ तालुकाध्यक्ष रवींद्र गडदे, माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे, आनंता देशमुख, उमेश देशमुख, दत्तराव देशमुख, आदींनी निवेदन दिले आहे.