राज्याचा कौशल्य विकास विभाग’ पुरविणार प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:07+5:302021-06-04T04:23:07+5:30
यानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये व २० खाटांपेक्षा अधिक सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयाद्वारे वैद्यकीय क्षेत्राशी संबधित रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या ...
यानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये व २० खाटांपेक्षा अधिक सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयाद्वारे वैद्यकीय क्षेत्राशी संबधित रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या बाबीनुसार व्यावसायिक प्रशिक्षण देता येणार आहे. राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत जनरल ड्युटी असिस्टन्स, जनरल ड्युटी असिस्टंन्स ॲडव्हॉन्स, मेडिकल रेकॉर्ड असिस्टन्स आदी तसेच आयुषशी संबधित पंचकर्म टेक्नीशियन, योगा वेलनेस ट्रेनर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर या सारखे एकूण ३७ र्कोसेसद्वारे प्रशिक्षित मनुष्यबळ जिल्ह्यातील रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस आहे.
जिल्ह्यातील ज्या खाजगी व शासकीय रुग्णालयांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तसेच मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जे रुग्णालय (ओजेटी-आरपीएल) मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक असतील अशा रुग्णालयांनी https://tinyurl.com/2cjfnx4s या लिंकवर मागणी नमूद करावी, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सुमीत पोटे यांच्याशी ९९७०१२५०३९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे.