हिंगोलीत डिजिटल पद्धतीने स्वच्छतेकडे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:44 PM2017-12-31T23:44:04+5:302017-12-31T23:44:47+5:30

नागरिकांच्या मनात नगर पालिकेतर्फे स्वच्छतेचा जागर निर्माण केला जात असून डिजिटल पद्धतीने हिंगोलीकरांचे पाऊल स्वच्छतेकडे पडत आहे. स्वच्छता अ‍ॅपद्वारे दिड महिन्यात ३६२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३३८२ तकारींचा निपटारा पालिकेने केला आहे. तर २६०० जणांनी स्वच्छता अ‍ॅप, डाऊनलोड केले आहे.

Stepping towards digital cleanliness in Hingoli | हिंगोलीत डिजिटल पद्धतीने स्वच्छतेकडे पाऊल

हिंगोलीत डिजिटल पद्धतीने स्वच्छतेकडे पाऊल

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगोली : ‘स्वच्छता’ अ‍ॅपवर ३६२७ तक्रारीं

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नागरिकांच्या मनात नगर पालिकेतर्फे स्वच्छतेचा जागर निर्माण केला जात असून डिजिटल पद्धतीने हिंगोलीकरांचे पाऊल स्वच्छतेकडे पडत आहे. स्वच्छता अ‍ॅपद्वारे दिड महिन्यात ३६२७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३३८२ तकारींचा निपटारा पालिकेने केला आहे. तर २६०० जणांनी स्वच्छता अ‍ॅप, डाऊनलोड केले आहे.
शहरात स्वच्छ भारत अभियान प्रभाविपणे राबविले जात असून स्वच्छतेसंदर्भात हिंगोली नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. अ‍ॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी धावपळ करीत असून शहर स्वच्छतेचे महत्व पटवून सांगत आहेत. त्यामुळे हिंगोली स्वच्छ व सूंदर शहरचे स्वप्न पुर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील साफसफाईची कामे योग्यप्रकारे केली जात आहेत. शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता अ‍ॅपवर’ नागरिक कच-याचे फोटो अपलोड करीत असून अ‍ॅपद्वारे प्राप्त झालेल्या ३६२७ पैकी ३३८२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण -२०१८ साठी अ‍ॅप डाऊनलोडवर पालिकेने भर दिला आहे. पालिकेचे कर्मचारी नागरिकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन करत असून, अ‍ॅप डाऊनलोडही करून देत आहेत. व्यापारी वर्ग, रेल्वेस्थानक, महाविद्यालये, शाळा व शहरातील मुख्यालये, वर्दळीच्या ठिकाणी जाऊन पालिकेचे अधिकारी व कर्मचारी अ‍ॅपची माहिती देत आहेत. स्वच्छता मोहीमेस नागरीकही प्रतिसाद देत असून शहरातील अस्वच्छतेची माहिती पालिकेला देत आहेत.
अभियान : सोशलमिडियाद्वारे जनजागृती
स्वच्छता अ‍ॅप डाऊलोड कसे करावे, या संदर्भात पालिका सोशल मिडीयाद्वारे प्रचार व प्रसार करीत आहे. प्लेस्टोर मध्ये जाऊन स्वच्छता अ‍ॅप सहजरित्या मोबाईलधारक डाऊनलोड करून शकतो. पालिकेत येणाºया प्रत्येकांना अ‍ॅपचा वापर करण्याचा संदेश अधिकारी व कर्मारी देत आहेत. शहरातील प्रत्येक वार्डमध्ये दररोज पालिकेची घंटागाडी सकाळी कचरा उचलण्यासाठी येत आहे. ओला व सुका कचºयाचे वर्गीकरण केले जात असून त्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. हिंगोली शहरातील दरदिवशी ५१ मे. टन कचºयाचे व्यवस्थापन करण्यात येते.

Web Title: Stepping towards digital cleanliness in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.