दोन ठिकाणी चोरीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:58 PM2018-05-28T23:58:41+5:302018-05-28T23:58:41+5:30
बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत वेगवेगळ्या कारणाने दोघांचा मृत्यू झाला. एका ठिकाणी १० क्विंटल हळद चोरीला गेली तर एका आखाड्यावरून दुचाकी चोरीस गेली आहे. तर एका दुचाकीस्वारास जीपने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. या विविध घटनेप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत वेगवेगळ्या कारणाने दोघांचा मृत्यू झाला. एका ठिकाणी १० क्विंटल हळद चोरीला गेली तर एका आखाड्यावरून दुचाकी चोरीस गेली आहे. तर एका दुचाकीस्वारास जीपने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. या विविध घटनेप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
विषारी द्राव्य प्राशन केल्याने एकाचा मृत्यू- कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील गजानन कदम यांचे शेतात राहणाऱ्या व कोपरवाडी येथील संगीता राजू डाखोरे (२६) या महिलेने २२ मे रोजी सकाळी ११ वाजता कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार दिले. पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले. नांदेडच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता तीचा मृत्यू झाला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार आर.जे. बायस यांच्या खबरीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार वडकिल्ले करीत आहेत.
दुचाकी लंपास
बेलमंडळ येथील माणिक फकिरा मुधोळ यांच्या शेतातील आखाड्यावरील घरासमोर उभी असलेली दुचाकी क्र. एम.एच.३८, एच. ११५६ ही दि. १७ मे रोजी रात्री १२ वाजेनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी बाळापूर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास एएसआय नागनाथ दीपक करीत आहेत.
जीपच्या धडकेत एक जखमी
हिवरा येथील किशनराव गणपतराव कदम (५०) हे २९ मार्च रोजी आर्धापूर येथून खासगी काम करून दुचाकीने गावाकडे परत येत होते. हिवरा पाटीजवळ आले असता जीप क्र. एम.एच.३८- ५४२२ च्या चालकाने जीप निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिल्याने या अपघातात कदम जखमी झाले होते.
१० क्विंटल हळदीची चोरी
४ कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी शिवारातील बाळासाहेब अबनराव पानपट्टे यांनी त्यांच्या शेतात हळद ढोल करून खताच्या रिकाम्या पोत्यात २४ कट्टे हळद अंदाजे १० क्विंटल भरून ठेवली होती. १४ मे रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. या प्रकरणी २८ मे रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार कांबळे करीत आहेत.
युवकाचा मृत्यू - घोडा येथील युवक बाळू यादवराव पतिंगराव (२१) हा २१ मे रोजी आपले राहते घरासमोर रात्री ८ वाजता पडला. यात तो जखमी झाला. बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार दिल्यानंतर त्याला नांदेडच्या सरकारी दवाखान्यात उपचारकामी हलविले. नांदेड येथे उपचार सुरू असताना २७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. यादवराव जळबाराव पतिंगराव रा. घोडा यांच्या खबरीवरून बाळापूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.