पोट भरण्याची मारामार; तरीही मी शासनाचा ‘टॅक्स’ भरतोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:09+5:302021-09-23T04:33:09+5:30
हिंगोली : जन्माला आलेला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या स्वरुपामध्ये शाासनाला ‘टॅक्स’ भरतच असतो. यातून गरीबही सुटलेले नाहीत. शासनाने ...
हिंगोली : जन्माला आलेला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या स्वरुपामध्ये शाासनाला ‘टॅक्स’ भरतच असतो. यातून गरीबही सुटलेले नाहीत. शासनाने करामध्ये सूट द्यावी, असे गरिबांचे म्हणणे आहे.
वर्षाकाठी मालमत्ता कर, पाणीपट्टी, रस्ते कर, बगिचा, फूटपाथ कर, भाजी मंडईतील छोटे व्यापारी आदी वेगवेगळ्या स्वरुपात शासनाकडे कर भरत असतात. भाजी मंडईत जागा नसल्यामुळे अनेकजण गल्लोगल्ली भाज्या विकतात. फेरीवाल्यांकडूनही नाममात्र स्वरुपात कर घेतला जातो. कर वसूल करण्यासाठी टेंडर काढून टेंडरधारकाला कर गोळा करण्याची परवानगी दिली जाते, असे नगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
आपण भरता का?
१) ऑटोचालक : शासनाचा कोणताही कर आम्ही चुकवत नाही. वेळेच्यावेळी आम्ही कर शासनाकडे भरुन रितसर पावतीही घेतो, असे ऑटोचालकांनी सांगितले.
२) भाजीपाला विक्रेते : भाजी विक्रीसाठी मंडईत जागा मिळाली आहे. नगरपालिकेचा कर्मचारी आला की जागेचे भाडे त्याला दिले जाते. नंतर ते कर्मचारी आम्हाला पावती देतात.
३) फेरीवाले : भाजी मंडईत जागा नसल्यामुळे गल्लोगल्ली जाऊन भाजी विकतो. गल्लोगल्ली फिरण्यासाठी नाममात्र कर आहे. तो कर आम्ही भरतो.
४) सफाई कामगार : घर स्वत:चे झाले म्हणून काय झाले. वर्षाकाठी मालमत्ता कर आम्ही भरतोच.
५) सलून चालक : शासनाचा कोणताही कर आम्ही चुकवत नाही. वेळेच्यावेळी शासनाला कर भरतो. त्याची रितसर पावतीही घेतो.
६) लाँड्री चालक : घर-संसार चालविण्यासाठी फुटपाथवर लाँड्रीचे दुकान थाटले आहे. नगरपालिकेचा कर्मचारी आला की आम्ही त्याला कर देतो.
प्रतिक्रिया...
नगरपालिकेच्या क्षेत्रात जर कोणी किरकोळ व्यवसाय करत असेल तर नियमाप्रमाणे त्याच्याकडून नाममात्र स्वरुपात कर घेतला जातो.
- डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी.
-