वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक;तिघे ताब्यात

By विजय पाटील | Published: October 31, 2023 01:01 PM2023-10-31T13:01:23+5:302023-10-31T13:03:25+5:30

माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानी अज्ञातांनी गेट व दरावर दगडफेक केली.

Stone pelting at the house of former minister Jaiprakash Mundada in Wasmat; three arrested | वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक;तिघे ताब्यात

वसमत येथे माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक;तिघे ताब्यात

हिंगोली: वसमत येथील माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर आज अज्ञातांनी दगडफेक केली. या घटनेची माहिती कळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वसमत शहरातील जुने तहसील परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता  माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानी अज्ञातांनी गेट व दरावर दगडफेक केली. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना मिळताच घटनास्थळी सपोनि पंढरीनाथ बोदणापोड, जमादार गजानन भोपे,शेख हकीम,बालाजी मिरासे आदींनी यांच्या सह आदि पोलिसांनी तातडीने धाव घेत  तिघांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला आहे.ताब्यात घेतलेल्या तिघांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Stone pelting at the house of former minister Jaiprakash Mundada in Wasmat; three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.