विहिरीत दगड कोसळल्याने दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:20 AM2019-01-03T00:20:47+5:302019-01-03T00:21:03+5:30
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे शिवारात विहिरीचे खोदकाम करत असताना अचानक क्रेनचे वायर तुटल्याने दगड अंगावर पडून दोन मजूर जखमी झाल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डिग्रस क-हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस क-हाळे शिवारात विहिरीचे खोदकाम करत असताना अचानक क्रेनचे वायर तुटल्याने दगड अंगावर पडून दोन मजूर जखमी झाल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.
डिग्रसकºहाळे शिवारात एका विहिरीचे खोदकाम काम सुरू होते. विहिरीतील दगडमाती बाहेर काढण्यासाठी विहिरीवर क्रेन बसविण्यात आले होते. यावेळी आठ मजूर विहिरीचे खोदकाम करीत होते. मंगळवारी विहिरीचे खोदकाम सुरू होते.
यावेळी क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील ९० किलोचा दगड बाहेर काढत असताना अचानक क्रेनचे वायर तुटला अन् दगड उंचावरून विहिरीत कोसळला. यावेळी विहिरीतील दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. बाळू घोंगडे (२५) रा. जलालाधाबा ता. हिंगोली व मारोती गिरी (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे.
सदर घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हिंगोली ग्रामीण ठाण्यात नोंद झाली नव्हती.
विहिरीचे खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील दगड बाहेर काढत असताना अचानक क्रेनचे वायर तूटून ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजूरावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.