डिग्रस पाटीवर रास्ता रोको; पुसेगावात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:36 AM2018-08-15T00:36:51+5:302018-08-15T00:37:06+5:30
दिल्ली येथे जंतर-मंतर येथे संविधानाच्या प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या आरोपींविरूद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने १४ आॅगस्ट रोजी औंढा- हिंगोली मुख्य रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
डिग्रस क-हाळे : दिल्ली येथे जंतर-मंतर येथे संविधानाच्या प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या आरोपींविरूद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने १४ आॅगस्ट रोजी औंढा- हिंगोली मुख्य रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला पुरूष तसेच गावातील मुस्लिम व मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामीण ठाण्याचे पोनि मारूती थोरात यांना देण्यात आले. मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आल्याने काहीवेळ वाहतूक ठप्प होती.
पुसेगाव : दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर भारतीय संविधानाची छायांकित प्रत जाळून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ पुसेगाव येथे १४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भव्य रॅली काढून निदर्शन करण्यात आले. आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भिम आर्मी शाखेच्या वतीेने केली. यावेळी प्रा. प्रकाश ठोके, मधुकर पुंडगे, विश्रमा इंगळे, शिवरामजी वाठोरे, सुरेंद्र धाबे, अशोक धाबे, मिलींद खिल्लारे, बबन खिल्लारे, भिकाजी धाबे, दादाराव पंडित, प्रदीप मोगले, जनार्धन धाबे, राहूल धुळे, दिपक धाबे, प्रकाश ठोके, राजू खंदारे, अरुण धाबे, बंडू धाबे, सुनील बनसोडे, गौतम धाबे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव रॅलीत सहभागी झाले होते.