आजेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:00 AM2018-01-17T00:00:25+5:302018-01-17T00:00:43+5:30
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे दोन गटांत वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हे दाखल झाले. आजेगाव येथील घटनेचा निषेधार्थ १६ जानेवारी रोजी ठिकठिकाणी आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे दोन गटांत वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हे दाखल झाले. आजेगाव येथील घटनेचा निषेधार्थ १६ जानेवारी रोजी ठिकठिकाणी आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आजेगाव येथे बॅनरवर ध्वज लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे विविध संघटनांनी मंगळवारी सदर घटनेचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन व बंद पाळला. अकोला-बायपास येथे रास्ता रोको बासंबा : हिंगोली तालुक्यातील बळसोंड परिसरातील अकोला-बायपास येथे मराठा शिवसैनिक सेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे यांनी आंदोलनात उपस्थित समाजबांधवाना मार्गदर्शन केले. तसेच अॅट्रॉसिटी व दरोड्यासारखे दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. रास्ता रोको आंदोलनामुळे येथील मुख्य रस्त्यावरील जवळपास एक तास वाहतूक ठप्प होती.
औंढा येथे रास्ता रोको
औंढा नागनाथ : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे झेंड्याच्या कारणावरून दाखल केले हे खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील विश्रमगृहासमोर मंगळवारी दुपारी १२ वा मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.
आजेगाव येथे बॅनरवर झेंडा लावल्यामुळे दोन गटांत वाद निर्माण होऊन दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान अनेक तरुणावर दाखल झालेले अॅट्रॉसिटी व दरोड्याचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी मराठा शिवसैनिक सेना औंढा नागनाथ तर्फे हिंगोली परभणी राज्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृहासमोर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मराठा शिवसैनिक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे पाटील, संजय भामिरगे, रवी मगर, दीपक शिंदे, मंचकराव कदम, वैजनाथ बोगाणे, सचिन देशमुख, बालाजी झाडे, दीपक जगताप, राम गोरख, गजानन जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले. पोलीस विभागाचे पोनि कुंदनकुमार वाघमारे, बालाजी येवते, साईनाथ अनमोड, किशोर पोटे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव आदी उपस्थित होते.
प्रशासनास निवेदन
डोंगरकडा : अॅट्रॉसिटीचे व दरोड्याचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी १६ जानेवर रोजी नांदेड- हिंगोली महामार्गावरील डोंगरकडा येथे मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. कळमनुरीचे नायब तहसीलदार पाचपुते व पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांना निवेदन देण्यात आले. रास्ता रोको शांततेत पार पडला. यावेळी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. निवेदनावर पप्पू अडकिणे, संदीप अडकिणे, जी.डी. अडकिणे, तुषार गावंडे, नाना गावंडे, किशन अडकिणे, शिवराज अडकिणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
आंदोलन: मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प
केंद्रा बु. : आजेगाव येथील घटनेच्या निषेधाचे ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले. तसेच सदर घटनेच्या निषेधार्थ १७ जानेवारी रोजी बंद पाळण्यात येणार आहे. दाखल केलेले अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
सवना येथे रास्तारोको
हिंगोली तालुक्यातील सवना येथे आजेगाव येथील घटनेचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अॅट्रोसिटी, दरोडासारखे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
गोरेगाव येथे कडकडीत बंद
४गोरेगाव : आजेगाव येथील घटने प्रकरणी १६ जानेवारी रोजी गोरेगाव येथे तीव्र निषेध नोंदवित दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आला. गोरेगाव येथे मंगळवारी समस्त ग्रामस्थांच्या वतीने स्वयंस्फूर्तीनी आजेगाव घटनेचा निषेध नोंदवित दाखल केलेले अॅट्रॉसिटीची खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी बंदला े प्रतिसाद देत व्यापाºयांनी दिवसभर आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.