सिंदगी येथे होणारा बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:04+5:302021-06-17T04:21:04+5:30
१६ जून रोजी कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे १५ वर्षीय बालिकेचा विवाह होणार आहे, अशी माहिती मिळताच जिल्हाधिकारी ...
१६ जून रोजी कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे १५ वर्षीय बालिकेचा विवाह होणार आहे, अशी माहिती मिळताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बालसंरक्षण अधिकारी जारीबखान पठाण, कायदा तथा परीविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक, टीम मेंबर स्वप्निल दीपके यांनी घटनास्थळी पोहोचून सदर घटनेची चौकशी केली. सदर बालिकेच्या आई, वडील, काका, काकू यांना बालविवाह करण्याचे दुष्परिणाम समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून १८ वर्षाच्या आत लग्न न करण्याबाबत जबाब लिहून घेण्यात आला. या ठिकाणी ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आर.डी. कुलकर्णी, सरपंच सत्वशीला मगर, अंगणवाडीसेविका सुधाताई मगर, जि.प. सदस्य बाळासाहेब मगर, उपसरपंच अरुणा मगर, ग्राम बालसंरक्षण समिती सदस्य सचिव उपस्थित होते.