वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली

By यशवंत भीमराव परांडकर | Published: September 30, 2022 07:00 PM2022-09-30T19:00:59+5:302022-09-30T19:01:24+5:30

दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता.

storm hits, toll tower in Hingoli was destroyed, fortunately no loss of life | वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली

वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली

Next

कनेरगाव नाका (जि. हिंगोली): येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेला राज्य महामार्गावरील टोलनाका वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडल्याची घटना आज दुपारी घडली. सुदैवाने कोणत्याही वाहनाला किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही.

जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास वाशिम हद्दीतील तोंडगाव फाट्याजवळ पावसाला सुरुवात झाली. दरम्यान,वादळीवारेही सुटले. या वादळातच महामार्गावरील टोलनाका अचानक उन्मळून पडला. यावेळी रस्त्यावर वाहतूक नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, टोलनाका पडल्यामुळे बाजूने वाहनांना पर्यायी रस्ता देण्यात आला होता. यामुळे वाहतुक काही वेळातच सुरळीत झाली. दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. आज जिल्ह्यात बहुतांश ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी वादळासह पाऊस पडल्याची माहिती आहे. 

Web Title: storm hits, toll tower in Hingoli was destroyed, fortunately no loss of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.