...तर मद्य विक्रेत्यांवर कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:41 AM2019-04-16T00:41:44+5:302019-04-16T00:42:08+5:30
लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदान व मतमोजणीच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही, तसेच अनुचित प्रकार घडू नये, याबाबत खबरदारी घेत मुंबई मद्य निषेध कायदा, १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर १६ एप्रिल रोजी (सायंकाळी ५.३० नंतर), दिनांक १७, १८ एप्रिल २०१९ व २३ मे रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्रीसाठी मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. निवडणूक काळात मद्यविक्रीच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केले जाणार आहे. जिल्ह्यात आचारसंहिता लागू केल्यानंतरही अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेत मद्याची विक्री करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करून अनेकांना अटक केली. निवडणुकीच्या काळात मद्याचा अतिरिक्त साठा केला जाऊ नये, याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. मतदानाच्या अगोदर दोन दिवस आणि मतदानाच्या दिवशी मद्य विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध धडक मोहीम राबवून करडी नजर ठेवली जाणार आहे.
जिल्ह्यात ३९ परवानाधारक देशी दारूची दुकाने आहेत. तर ९१ बार असून ४ वाईन शॉप आहेत. तसेच बियरशॉपींची ४० च्या वर संख्या आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. शिवाय याबाबत संबधित दुकाचालकांना कळविण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान आदर्श आचार संहितेत अवैधरित्या दारू विक्री करणाºयांवर पथकाकडून धडक कारवायाही करण्यात आल्या. संबधित आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करून दारूसाठा जप्त केला. तर रसायनही नष्ट करण्यात आले.
दुसºया टप्यात हिंगोली लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक निर्भपणे व मुक्त वातावरणात पार पडावी यासाठी मद्य विक्रीस मनाई करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दुकाने बंदचे आदेश आहेत.