आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:25 AM2019-03-12T00:25:17+5:302019-03-12T00:26:04+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले.
हिंगोली जिल्ह्याला लागून सहा जिल्ह्यांच्या सीमा आहेत. परजिल्ह्यातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. अवैधरीत्या दारु, पैसा वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देखरेखीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन सर्वांना कडक सूचना करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या विविध परवानग्या पोर्टलवर आॅनलाईन देण्यात येणार आहेत. शासकीय संकेतस्थळावर राजकीय नेत्यांचे फोटो भिंतीवरील पोस्टर, बॅनर्स, राजकीय झेंडे तसेच शासकीय कार्यालयाच्या भिंतीवरील पोस्टर, भिंतीपत्रके काढण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय नेते निवडणूक प्रचारासाठी शासकीय संपत्तीचा दुरुपयोग करणार नाहीत, या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येणार आहे. तक्रार व देखरेख यंत्रनेची स्थापना केली जाणार आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी चोरमारे अ. पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदी.