हिंगोलीत जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 02:13 PM2021-02-26T14:13:28+5:302021-02-26T14:16:21+5:30

 बंदमध्ये कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ सहभागी, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांच्या इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

Strict closure of traders in Hingoli against GST | हिंगोलीत जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

हिंगोलीत जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

Next

हिंगोलीजीएसटी करप्रणालीतील नोटीफिकेशन व सुधारणांमुळे करप्रणाली अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची ठरत आहे. अनेक छोटेमोठे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जीएसटी कायद्यातील जाचक अटी आणि तरतुदी रद्द करून कायद्याचे सरळीकरण करण्यात यावे, या मागणी करता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात कडकडीत बंद पुकारण्यात आला. यात हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांच्या इतर संघटना सहभागी झाल्या आहेत. 

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जीवनावश्यक व खाद्यान्न वस्तूवर जीएसटी नसावा, रिटर्न चुकीचे असेल तर ते दुरुस्त करण्याची तरतूद असावी IGST ऐवजी CGST आणि SGST किंवा CGST आणि SGST ऐवजी IGST भरला गेला असेल तर करदात्याला तो समायोजित करण्याची तरतूद असावी, विविध प्रकारचे लेजर (CGST, IGST, SGST व्याज दंड) ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे, दोन महिने रिटर्न भरले नसले तर व्यवसायिकांचे ई- वे बिल करता येत नाही. त्यामुळे पुरवठादारास विनाकारण त्रास होतो. वसुली आणि पुरवठा संबंधीच्या अडचणी निर्माण होतात. नवीनच आलेल्या ई - वे बिलाची वैधता २४ तासात १०० किलोमीटर ऐवजी २०० किलोमीटर करण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक अडचणी निर्माण होणार आहेत. सदर बाबतीत सुट्या, बंद, एकाच वाहनातून अनेकजागी खाली होणारा माल या गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही. जीएसटीचे अधिकाऱ्यामार्फत कोणतीही पूर्व सूचना अथवा खुलासा करण्याची संधी न देता जीएसटी नोंदणी रद्द करण्याची तरतूद अन्यायकारक आहे. आधार कार्डवर आधारित नवीन नोंदणीसाठी तीन दिवस तर इतरांसाठी सात दिवस अशी कालमर्यादा बदलून ती सात दिवस आणि तीस दिवस करण्यात आलेली आहे. सदरचा बदल अनावश्यक आहे. पुरवठादाराने जीएसटी भरला नाही तर त्याची जबाबदारी खरेदी दारावर येत आहे. ती तरतूद बदलावी, जीएसटी सोबत फूड सेफ्टी कायदा तसेच आयकर कायद्यातील काही तरतुदी प्रामाणिक व्यवसायिकांना अन्यायकारक असून त्यात बदल होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जीएसटीतील अन्यायकारक व किचकट तरतुदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ सहभागी, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांच्या इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनावर माजी आ. गजाननराव घुगे, नंदकिशोर तोष्णीवाल, मयुर कयाल, अनिल नैनवाणी, कैलाश काबरा, प्रशांत सोनी, संजय देवडा, सुमीत चौधरी, जगजीतराज खुराना, पंकज वर्मा,रमेशचंद बगडीया, इंदरचंद सोनी, धरमचंद बडेरा, हाजी एकबाल, सुभाषचंद्र काबरा, मनोज आखरे, रत्नदीपक सावजी, गजानन कानडे, द्वारकादास झंवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Strict closure of traders in Hingoli against GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.