जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी करा : विशेष पोलीस महानिरीक्षक पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 06:11 PM2018-08-18T18:11:44+5:302018-08-18T18:13:10+5:30
जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज येथे केले.
आखाडा बाळापुर (हिंगोली) : पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्याकरता पोलिसांनी प्रयत्न करावेत. पोलिसांनी माणुसकी जपली पाहिजे. तसेच जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज येथे केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार व नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज आखाडा बाळापुर ठाण्याला भेट दिली. यावेळी तंटामुक्ती भवनात शांतता समितीचीही बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मार्गदर्शन करताना फत्तेसिंह पाटील म्हणाले की, पोलिस हे जनतेचे सेवक आहेत. पोलिसांनी जनतेशी सुसंवाद ठेवला पाहिजे. तसेच त्यांनी कायम सजग राहत कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी नागरिकांच्या सकारात्मक कामात पोलीस सदैव मदत करतील असे आश्वासन दिले.
बैठकीत संजय बोंढारे ,जकी कुरेशी, विठ्ठल पंडित, धनंजय सूर्यवंशी, ठाकूरसिंग बावरी, डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर, डॉ.उषा कदम यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जि. प. सदस्य दिलीप देसाई ,उपसभापती अजय सावंत ,बी.बी.पतंगे ,आनंदराव कदम, भारत कदम ,चांदु भिसे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी केले.