दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:07 AM2019-02-17T00:07:28+5:302019-02-17T00:08:45+5:30

पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले.

 Struggling to protest terrorist attacks | दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले. मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, व्यापारी तसेच महिलांचा यात समावेश होता.
हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक येथे अकोला बायपास येथे युवकांनी प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त केला. तसेच अकोला बायपास येथे प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. सकाळपासून हिंगोली शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पाकिस्तानविरोधी घोषणांनी शहर परिसर दुमदुमुन गेले होते. व्यापारी महासंघाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. गांधीचौक येथे शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, व्यापारी, राजकीय पुढारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेनगाव येथे बंद
सेनगाव : जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे लष्करावर झालेल्या हल्ल्याचा सेनगाव शहरात निषेध करण्यात आला. हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सेनगाव शहरातील बाजारपेठ व्यापाऱ्यांनी दिवसभर कडकडीत बंद ठेवली होती.
सेनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देत, हल्ल्याचा निषेध करण्यात आला. येथील आप्पास्वामी प्रवेशद्वारावर श्रध्दांजली वाहून रॅलीची सांगता करण्यात आली. शनिवारी या हल्ला चा निषेध व जवानांना श्रध्दांजली करीता व्यापाºयांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. येथील बाजार समितीत शहीद जवानांना व्यापारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व कर्मचाºयांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या वतीने येथील आप्पास्वामी चौकात पाकिस्तानच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करीन करण्यात आले. तोष्णीवाल महाविद्यालयाच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावरून प्रभात फेरी काढली. विद्यार्थ्यांनी शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान निषेध असो अशा घोषणा दिल्या. यावेळी तोष्णीवाल महाविद्यालय, ओमप्रकाश देवडा विद्यालय, एआरटीएम शाळेचे विद्याथीर् सहभागी झाले.
बाळापुरात पुतळा जाळला
आखाडा बाळापूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आखाडा बाळापुर व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बाळापूर येथील नवीन बसस्थानकजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व शेवाळा रोडवरील मिलन चौकात पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शनिवारी सकाळी पासून बाळापुर येथील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. यात फळविक्रेते व चहा टपरीवालेही बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे परिसरात सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला. नवीन बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी चौकात सर्व एकत्रित मिळून पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले तसेच शेवाळा रोडवरील मिलन चौकातही मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून पाकिस्तान मुदार्बाद अशा घोषणा दिल्या.
औंढा नागनाथ : दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना औंढा नागनाथ येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम औंढा शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौकामध्ये घेण्यात आला. यावेळी शहीदांना श्रद्धांजली यांचे बॅनर लावून बॅनर च्या समोर भारत मातेचा फोटो लावून श्रद्धांजली व रांगोळी काढण्यात आली. यावेळी पोनि कुंदनकुमार वाघमारे, सुरजितसिंग ठाकूर, सचिन देव, मुंजाजी गोबाडे, दिपाली पाटील, जयाताई देशमुख, विजयमाला मुळे, आलका कुरवाडे, तेजकुमार झांझरी, सचिन देव, बालाजी सातव, पांडुरंग पाटील, सुनील पुराणिक, सुरेश गिरी, अनिल देशमुख, अ‍ॅड.शकर देशपाडे, सुनील देशमुख, गणेश देशमुख, राम मुळे, गणेश कुरवाडे, अरुण देशमुख, सतीश चोंडेकर, जकी काजी, गंगाधर जावळे, मनोज आग्रवाल, गणेश कुरवाडे, साहेबराव देशमुख, शाहु ईप्पर आदी उपस्थित होते.
प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ औंढा येथे दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र शब्दात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद-आतंकवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर, राम कदम, साहेबराव देशमुख, जी. डी. मुळे, अनिल देव, मनोज देशमुख, गणेश कुरवाडे, राम मुळे, विष्णू जाधव, सतीश चोंडेकर, महेश खुळखुळे, प्रदीप कनकुटे, राहुल दंतवार, अनिल कनकुटे, राजू वाकोडे, साई गोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Struggling to protest terrorist attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.