एमपीएससीच्या परीक्षा चौथ्यांदा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे आक्राेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:54 AM2021-03-13T04:54:12+5:302021-03-13T04:54:12+5:30
अशा आहेत उमेदवारांच्या भावना अनेक मोठे कार्यक्रम होत आहेत. अशा कार्यक्रमांना हजारोंची गर्दी राहात आहे. फक्त एमपीएससीची परीक्षा घेण्यासच ...
अशा आहेत उमेदवारांच्या भावना
अनेक मोठे कार्यक्रम होत आहेत. अशा कार्यक्रमांना हजारोंची गर्दी राहात आहे. फक्त एमपीएससीची परीक्षा घेण्यासच कोरोनाचे कारण का पुढे केले जात आहे, असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला. आम्ही एवढ्या दिवसांपासून करीत असलेली तयारी वारंवार वाया जात आहे. शिवाय आमच्या वाढत्या वयाचाही प्रश्न आहे. ही परीक्षा होत नसल्याने रोजगाराच्या इतर संधींपासूनही दूर राहण्याची वेळ आली. शिवाय यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. गोरगरिबांची मुले आहेत, त्यांना वारंवार असा खर्च परवडत नाही, असे अनेक उमेदवारांचे म्हणणे होते. त्यामुळे १४ रोजीच परीक्षा घ्यावी. खाजगी यंत्रणेमार्फत नव्हे, तर एमपीएससीमार्फतच वर्ग १ व २ च्या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणीही केली. अन्यथा अटक झाली तरीही चालेल आम्ही भविष्यात आंदोलन पुकारू, असा इशाराही या उमेदवारांनी दिला.