विद्यार्थ्यांची आयटीआयलाच पसंती; जागांच्या तुलनेत जादा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:30 AM2021-07-28T04:30:56+5:302021-07-28T04:30:56+5:30

हिंगोली : दहावीच्या निकालाची वाढलेली टक्केवारी व शासकीय नोकरीत असलेली स्पर्धा लक्षात घेता अनेक विद्यार्थी आयटीआयकडे वळले आहेत. यावर्षी ...

Students prefer ITIs; Excess application compared to seats | विद्यार्थ्यांची आयटीआयलाच पसंती; जागांच्या तुलनेत जादा अर्ज

विद्यार्थ्यांची आयटीआयलाच पसंती; जागांच्या तुलनेत जादा अर्ज

Next

हिंगोली : दहावीच्या निकालाची वाढलेली टक्केवारी व शासकीय नोकरीत असलेली स्पर्धा लक्षात घेता अनेक विद्यार्थी आयटीआयकडे वळले आहेत. यावर्षी उपलब्ध जागेच्या तुलनेत जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे. आठ दिवसांतच जिल्ह्यातील ९२४ जागांसाठी १००५ विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी नोंदणी केली आहे.

जिल्ह्यात सहा शासकीय, तर दोन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. सध्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेस १५ जुलैपासून सुरुवात झाली आहे. अद्याप दहावीचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना प्राप्त झाले नसले तरी आयटीआय प्रवेशाचा अर्ज भरल्यानंतर दहावीचे गुणपत्रक अर्जावर दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी कोणतीही अडचण येत नसल्याचे दिसत आहे. यावर्षी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे आहे. प्रवेशित जागांच्या तुलनेत जास्त अर्ज आले असून, आणखी विद्यार्थी अर्ज सादर करीत आहेत. २७ जुलैपर्यंत १०१५ जणांनी नोंदणी केली असून, १००५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जात परिपूर्ण माहिती भरली आहे.

येथे आहेत शासकीय आयटीआय

जिल्ह्यात हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी व जामगव्हाण (ता. कळमनुरी) अशा सहा ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत, तर हट्टा व कुरुंदा येथे प्रत्येकी एक अशा एकूण दोन खासगी संस्था आहेत.

आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे जास्त असल्याचे प्रवेश अर्जावरून दिसत आहे. आतापर्यंत १००५ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन सादर केले आहेत.

- अजय भूसारे, शिल्प निदेशक (कोपा) तथा जिल्हा समन्वयक, हिंगोली, परभणी

सर्वांना हवा इलेक्ट्रीशियन, कोपा, फिटर...

१) आयटीआय प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रथम पसंती ही इलेक्ट्रीशियन अभ्यासक्रमास दिसत आहे. अर्जात प्रथम पसंती या अभ्यासक्रमाला देत आहेत.

२) त्यानंतर वायरमन, फीटर, कोपा (कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅमिंग असिस्टंट) या अभ्यासक्रमाला विद्यार्थी पसंती देत आहेत.

३) दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या लक्षात घेता आयटीआयसाठी स्पर्धा वाढली आहे.

गतवर्षी १५ टक्के जागा रिक्त

- जिल्ह्यात सहा शासकीय व दोन खासगी आयटीआय आहेत. शासकीय आयटीआयमध्ये विविध ट्रेडला ६७२ प्रवेश क्षमता आहे.

- तर खासगी आयटीआयमध्ये २५४ प्रवेश क्षमता असून, एकूण ९२४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

- गतवर्षी यातील १५ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षी मात्र विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मोठा असल्याचे दिसत आहे.

एकूण जागा - ९२४

आलेले अर्ज - १००५

शासकीय संस्था - ६

खासगी संस्था - २

शासकीय जागा - ६७२

खासगी जागा - २५४

Web Title: Students prefer ITIs; Excess application compared to seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.