विषय शिक्षक दर्जोन्नतीत समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:28 AM2018-11-18T00:28:56+5:302018-11-18T00:29:12+5:30
जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना १९ व २० नोव्हेंबर रोजी समुपदेशानाने पदस्थापना देण्यात येणार आहे. विषय शिक्षकांनी होकार दिलेल्या शिक्षकांनी जि.प. सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील विषय शिक्षकांसाठी होकार दिलेल्या शिक्षकांना १९ व २० नोव्हेंबर रोजी समुपदेशानाने पदस्थापना देण्यात येणार आहे.
विषय शिक्षकांनी होकार दिलेल्या शिक्षकांनी जि.प. सभागृह हिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ६ वी ते ८ वीच्या वर्गावरील होकार दिलेल्या पात्र शिक्षकांना समुपदेशन प्रक्रियेद्वारे विषय शिक्षकासाठी पदोन्नती दिली जाणार आहे. याबाबत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी १७ नोव्हेंबर रोजी पत्र काढून शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार व अधिनियम २००९ मधील तरतुदीप्रमाणे उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान भाषा व सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया समुपदेशनाने जिल्हास्तरावर दोन दिवस होणार आहे. सदरील समुपदेशनच्या दिवशी कोणीही पात्र शिक्षक गैरहजर राहू नये, याची काळजी घेण्यात आली आहे. पात्र शिक्षक समुपदेशनास अनुपस्थित राहिला असेल तर त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार त्यांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक हित लक्षात घेता प्रशासकीय दृष्ट्या पदस्थापना देण्यात येणार आहे. पात्र शिक्षकांना कार्यरत शाळेवरच जागा रिक्त असेल तर तेथेच पदस्थापना देण्यात येणार आहे. कार्यरत शाळेवर विषय शिक्षकाची जागा रिक्त नसेल केंद्रांतर्गत शाळेत पदस्थापना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात विषय शिक्षकांच्या ६७२ जागा रिक्त आहेत. होकार दिलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात येणार आहे.
९३४ शिक्षकांनी विषय शिक्षकाच्या दर्जोन्नतीसाठी होकार दिलेला आहे. किती शिक्षक दर्जान्नतीला होकार व नकार देतात, हे समुपदेशनानंतरच कळणार आहे. जिल्ह्यातील ३७० शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत व बदली प्रक्रियेत रॅन्डम राऊंडने पदस्थापना कोठेही देण्यात आल्या. पदोन्नतीने तरी आपल्या तालुक्यात जाता येईल, यासाठी रॅन्डम राऊंडच्या शिक्षकांनी विषय शिक्षकासाठी होकार दिला होता. परंतु कार्यरत शाळेमध्येच दर्जाेन्नती केली जाणार असल्याने अनेक शिक्षकांचा हिरमोड झाला. जिल्हा स्तरावरून समुपदेशानाने विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या करा, या मागणीसाठी शिक्षकांनी अनेक आंदोलने केली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ग्रामविकास विभागाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार विषय शिक्षकांच्या दर्जोन्नत्या होणार आहेत.