‘योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:03 AM2018-11-12T01:03:41+5:302018-11-12T01:05:18+5:30

धाळ संकरित गायी, म्हशींचे तसेच शेळी-मेंढी गट वाटप करणे व मांसल कुक्कुटपक्षी संगोपनासाठी नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

 'Submit an application for the benefit of the scheme' | ‘योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करा’

‘योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करा’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दुधाळ संकरित गायी, म्हशींचे तसेच शेळी-मेंढी गट वाटप करणे व मांसल कुक्कुटपक्षी संगोपनासाठी नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
योजने अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील १८ वर्षांवरील अर्जदारांकडून १५ ते २९ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज फक्त आॅनलाईन पध्दतीनेच स्वीकारले जाणार असून इच्छुक अर्जदारांनी वर नमूद विहित कालावधीत आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार आहे.
त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेअंतर्गत लाभार्थी निवड अंतिम होईपर्यंत बदलू नये. या नाविन्यपूर्ण दुधाळ योजनेसाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश नाही, असे हिंगोली जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी सांगितले.

Web Title:  'Submit an application for the benefit of the scheme'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.