क्षेत्र नोंदणीकरिता प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:41 AM2018-10-26T00:41:58+5:302018-10-26T00:42:17+5:30
रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु झालेली आहे. त्यासंदर्भात बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाºया बीजोत्पादन कार्यक्रमांचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीजप्रमाणीकरणे यंत्रणेकडे सादर करण्याच्या पीकनिहाय अंतिम तारखा ठरविण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु झालेली आहे. त्यासंदर्भात बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाºया बीजोत्पादन कार्यक्रमांचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीजप्रमाणीकरणे यंत्रणेकडे सादर करण्याच्या पीकनिहाय अंतिम तारखा ठरविण्यात आल्या आहेत.
करडई व रब्बी ज्वारी पिकासाठी ३१ आॅक्टोबर, हरभरा पिकासाठी २० नोव्हेंबर, तर गहू व इतर पिकांसाठी १५ डिसेंबर या अंतिम तारखा असणार आहेत. सदर तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा असून क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर १५ दिवसांत करता येणार आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तसेच क्षेत्र नोंदणीकरीता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनिधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकाºयांसह करण्यात येणार ५०० रूपयांच्या बंधपत्रावरील करारनामा, स्त्रोत बियाणे खरेदी बिल, स्त्रोत बियाण्यांचे मूळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बीयाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकºयांच्या स्वाक्षरीत व परिपूर्ण माहिती भरलेला विहित अर्ज, बीजोत्पादकाचे महसूली दस्ताऐवज सातबाराव व ८ अ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बीजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्त्रोत बीयाणे वाटप अहवाल, गाव, पिक व दर्जा निहाय बीजोत्पादकांच्या विहित प्रपत्रातील याद्या ४ प्रतीत कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे. याकरीता क्षेत्र नोंदणी ५० रूपये प्रती बीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी फी पायाभूत बीजोत्पादनाकरिता २०० रूपये प्रतिएकर व प्रमाणित बीजोत्पादनाकरिता १५० रूपये प्रतिएकर याप्रमाणे आहे.
सविस्तर माहितीसाठी जिल्हास्तरीय बीज प्रमाणीकरण अधिकारी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन बीज प्रमाणिकरण यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.