वसमतच्या लासिन मठ व स्मशानभूमीच्या वादावर यशस्वी तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:30 AM2021-02-10T04:30:12+5:302021-02-10T04:30:12+5:30

लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले लासीनमठ संस्थान व रविवार पेठ मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरून वाद होता. दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे होत ...

Successful settlement of dispute over Lasin Monastery and Cemetery in Wasmat | वसमतच्या लासिन मठ व स्मशानभूमीच्या वादावर यशस्वी तोडगा

वसमतच्या लासिन मठ व स्मशानभूमीच्या वादावर यशस्वी तोडगा

googlenewsNext

लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले लासीनमठ संस्थान व रविवार पेठ मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरून वाद होता. दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे होत असत. अनेकदा वाद विकोपाला जाऊन शांतता भंग होण्याची वेळ आली होती. पोलिस ठाणे व न्यायालयात हे प्रकरण गेले होते. या वादामुळे शहरात दोन समाजात तणाव निर्माण होण्याची कायम भीती होती. दोन्ही बाजूने परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत. वाद मिटावा यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. अखेर कोणताही गाजावाजा न करता बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला हा तोडगा दोन्ही बाजूला मान्य झाला व कित्येक वर्षे सुरू असलेल्या वादावर कायमचा पडदा टाकण्यात यश आले. वाद मिटल्याचे जाहीर झाले तेव्हा दोन्ही बाजुवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. वादावर सुवर्णमध्ये काढणारा तोडगा जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास पाटील यांनी सुचवला. माजी नगराध्यक्ष तथा या भागाचे नगरसेवक शिवदास बोड्डेवार यांनी ही मोलाची भूमिका बजावली. दोन्ही समाजाला विश्वासात घेण्याचे काम त्यांनी केले. उपविभागीय पोलिस अधिकारी वशीम हाश्मी, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, तहसीलदार अरविंद बोळांगे, लासीन माठाधिश करबसव शिवाचार्य महाराज, ॲड. चंद्रकांत देवणे, ॲड. शेख मोहसीन, माजी नगरसेवक शिवाजी अल्डिंगे, शेख सलीम, शेख रशीद, शेख खुर्शीद आदींची यावेळी उपस्थिती होती. फोटो नं. २१

Web Title: Successful settlement of dispute over Lasin Monastery and Cemetery in Wasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.