अचानक संपामुळे प्रवाशांचे बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:53 AM2018-06-09T00:53:07+5:302018-06-09T00:53:07+5:30
शासनाने अपेक्षित पगारवाढ दिली नसल्याच्या कारणावरून परिवहन महामंडळाचे कर्मचारी अचानक संपावर गेल्याने गुरुवारी सकाळच्या ८ ते १0 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आगार नियंत्रकांनी फेºया सुरळीत केल्याचे पहायला मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाने अपेक्षित पगारवाढ दिली नसल्याच्या कारणावरून परिवहन महामंडळाचे कर्मचारी अचानक संपावर गेल्याने गुरुवारी सकाळच्या ८ ते १0 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आगार नियंत्रकांनी फेºया सुरळीत केल्याचे पहायला मिळाले.
राज्यात कर्मचाºयांनी अचानकच हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला. हिंगोलीतही त्याचे लोण पसरले होते. मात्र यामुळे सकाळच्या वेळच्या ८ ते १0 बसफेºया न झाल्याने प्रवाशांची बोंब वाढू लागली होती. त्यानंतर ९ च्या सुमारास हिंगोली बसस्थानकात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्याचबरोबर या अघोषित व अनधिकृत संपाबाबत प्रशासनानेही चालक-वाहकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक कर्मचाºयांनी पुन्हा कामावर येण्याची तयारी दर्शविली. तर जे कर्मचारी फेºया नेण्यास इच्छुक नाहीत, आज काम करण्यास इच्छुक नाहीत, अशांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे एकेक जण संपातून माघार घेताना दिसत होता. शिवाय कोणत्याही संघटनेने यासाठी पुढाकार घेतलेला नसल्याने पदाधिकारीही पुढे येत नव्हते. त्यामुळे कर्मचाºयांचे बळ अपुरे पडले.
याबाबत आगारप्रमुख झरीकर यांना विचारले असता ते म्हणाले, सकाळच्या वेळी काही फेºया रद्द कराव्या लागल्या. मात्र दहा वाजेनंतर सर्व काही सुरळीत सुरू आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही मागविला आहे. सेनगाव व औंढा नागनाथ येथे स्वतंत्र आगार नसल्याने इतर ठिकाणाहून येणाºया बसफेºयांवरच पूर्ण भिस्त आहे. इतरांच्या रद्द झालेल्या तेवढ्या फेºया रद्द झाल्याचे चित्र होते.
वसमतला सहभाग नाही
परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी पुकारलेला संप वसमतमध्ये पहायला मिळाला नाही. त्यामुळे या आगारातून सर्व बसफेºया सुरळीत सुरू असल्याचे चित्र होते.
कळमनुरी आगारातील कर्मचारी, चालक, वाहकांनी मात्र संपात पूर्णपणे सहभाग नोंदविल्याने दुपारपर्यंत केवळ पाचच बस आगाराबाहेर पडल्या. दिवसभरात येथून १८८ बसफेºया होतात. दुपारनंतर चित्र बदलेल. कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर येतील, अशी माहिती आगारातून देण्यात आली. येथे चालक ७१ व वाहक ७४
कार्यरत असून यांचाच संपात सहभाग आहे. प्रशासकीय व यांत्रिकी कर्मचारी मात्र कर्तव्यावर आहेत. येथून बसफेºया जात नसल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. याचा फायदा मात्र खाजगी वाहनांना मोठ्या प्रमाणात झाला.
बस कर्मचाºयांच्या संपामुळे रस्त्यावर बस धावल्याच नसल्याने मात्र तालुक्यातील अनेक खेड्या-पाड्यांतील लोकांना खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला. यातही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात होते.